Back

ⓘ समाजशास्त्र - समाजशास्त्र, मराठी समाजशास्त्र परिषद, तत्त्वज्ञानाचे समाजशास्त्र, आणि ऑगस्ट कॉम्त, कास्ट्स इन इंडिया, सदानंद भटकळ, भाषाशास्त्रीय मानवशास्त्र ..                                               

समाजशास्त्र

समाजशास्त्र म्हणजे माणसाचा समाजाशी असलेल्या आंतरसंबंधांचा अभ्यास होय. समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे. यात सामाजिक घटक व सामाजिक घडामोडींचा समावेश असतो. समाजाचे मन, मनाचा एकूण कल व समाज पाळत असलेले रीतिरिवाज यांचा शोध या शास्त्रात घेतला जातो. सामाजिक प्रश्नांची उकल करण्यासाठी समाजशास्त्र उपयुक्त असते. हे शास्त्र आंतरविद्याशाखीय स्वरूपाचे आहे. यामुळे याचा मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास व संख्याशास्त्र अशा अनेक शाखांशी संबंध येतो. यामध्ये लोकांच्या जीवनाचे वास्तव चित्रणाचे रुप रेखाटले जाते. लोकांच्या सामाजिक प्रश्नांचे निवारण येथे केले जाते. व्यवस्थाबद्द ज्ञान सम्मुचयास ...

                                               

मराठी समाजशास्त्र परिषद

मराठी समाजशास्त्र परिषदेचे २३वे राज्यस्तरीय अधिवेशन १८-१९ जानेवारी २०१३ला कोल्हापूर येथे होणार आहे. उद्‌घाटक कोल्हापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.जे. पवार असतील. बीजभाषण नेहरू विद्यापीठातील अभ्यासक डॉ नंदू राम करतील. अधिवेशनाचे विषय: सीमांतिक उपेक्षत समूह, अन्य विषय - शिक्षणाचे बाजारीकरण, कृषि धोरण, प्रसारमाध्यमे आदींचा उपेक्षित समूहांवर होणारे परिणाम.

                                               

तत्त्वज्ञानाचे समाजशास्त्र

तत्त्वज्ञानाचे समाजशास्त्र ही समाजशास्त्राची उपशाखा आहे, ही तत्त्वज्ञानाची शाखा नाही. तत्त्वज्ञानाचे समाजशास्त्र ही तुलनेने नवी संज्ञा आहे.ज्ञानाचे समाजशास्त्र आणि विज्ञानाचे समाजशास्त्र या संज्ञांच्या धर्तीवर ही नवी संज्ञा तयार करण्यात आली आहे. कोणत्या सामाजिक परिस्थितीत तात्त्विक विचार निर्माण होतात, त्या परिस्थितींचा अभ्यास या शाखेत केला जातो. हेतू तत्त्वज्ञानाचा समाजातील प्रभाव समजून घेणे हा या विद्याशाखेचा मुख्य हेतू आहे. तत्त्वज्ञानाच्या समाजावर वेगवेगळा परिणाम होत असतो. त्या परिणामांमध्ये आणि त्या काळातील वेगवेगळ्या बौद्धिक कृतींमध्ये गुंतलेल्या सामाजिक परिस्थिती समजावून घेणे; समाजा ...

                                               

समाजशास्त्र आणि ऑगस्ट कॉम्त

व्यक्तीच्या परस्पर सहचार्यातून सामाजिक संबंध निर्माण होतात. व या सामाजिक संबंधाचा वैज्ञानिक पध्दतीने आभ्यास केला पाहिजे.असे काही विचारवंतांना वाटू लागले व त्यांनी या सामाजिक संबंधाचा शास्त्रीय पद्धतीने आभ्यास करावयास सुरुवात केली व त्यामुळे प्रामुख्याने ऑगस्ट कॉम्त ने भौतिक शास्त्रात उपयोगात आणलेल्या पद्धतीचा वापर समाजशास्त्रत केला व समाजात सुद्धा नौसर्गिक शास्त्राप्रमाणेच शास्त्र आहे असे स्पष्ट केले. समाजशास्त्र मध्ये सामाजिक संबंधाचा आभ्यास केला जातो व हा आभ्यास करत असताना निरीक्षण, वर्गीकरण, गृहीत कृत्य, पूर्वकथान व निष्कर्ष इत्यादी मार्गाचा अवलंब समाजशास्त्रामध्ये करता येणे शक्य अाहे.अ ...

                                               

कास्ट्स इन इंडिया

कास्ट्स इन् इंडिया: देअर मेकनिझम, जेनसिस ॲन्ड डिव्हेलपमण्ट हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेला एक समाजशास्त्रीय लेख आहे, जो त्यांनी मे, इ.स. १९१६ मध्ये कोलंबिया विद्यापीठातील एका सेमिनारमध्ये वाचला होता. या लेखामुळे जगाला बाबासाहेबांच्या रूपात एक २५ वर्षीय तरूण भारतीय समाजशास्त्र जगाला गवला तसेच भारतातील जातीव्यवस्थेतीची किड संपूर्ण जगापुढे उघड झाली. नंतर हा इ.स. १९१७ मध्ये पुस्तक रूपात प्रकाशित झाला. याच्या अंतर्गत भारतात जातींची उत्पत्ती, गठन व विकास यावर प्रकाश टाकला गेला आहे. डॉ. आंबेडकरांच्या नजरेत, जाती एक असा परिबद्ध वर्ग आहे, जो स्वतः पुरताच मर्यादित राहतो. त्यांच्या अनुसार जाती स ...

                                               

सदानंद भटकळ

सदानंद भटकळ हे एक सामाजिक कार्यकर्ते होते. यांनी सुरू केलेल्या पॉप्युलर प्रकाशन या संस्थेच्या व्यवसायात उतरल्यावर सलग ६३ वर्षे त्यांनी या प्रकाशन संस्थेला आपल्या अथक प्रयत्नाने लौकिक मिळवून दिला. "पॉप्युलरच्या पुस्तकांचा जागतिक मान्यता होती. ग्रंथ प्रकाशनाच्या व्यवसायात असताना, त्यांचे सामाजिक कार्य सुरू होते. मुंबईच्या एल्‌फिन्स्टन महाविद्यालयातून समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र विषयाची एम.ए. पदवी घेतल्यावर, ते एलएलबी झाले. स्वातंत्र्याच्या चळवळीत ते सहभागी झाले होते. स्वातंत्र्यानंतर, भारतीय युवकांसमोरच्या समस्यांचा वेध घ्यायसाठी त्यांनी "द फ्यूचर ऑफ इंडियन यूथ, हा ग्रंथ लिहिला होता. उत्तम म ...

                                               

भाषाशास्त्रीय मानवशास्त्र

भाषाशास्त्रीय मानवशास्त्र हा भाषा आणि संस्कृती आणि मानवी जीवशास्त्र, माहिती आणि भाषा दरम्यान संबंध यांचा अभ्यास होय. मनुष्याची उत्पत्ति व विकास यांचें भाषाशास्त्रीय दृष्टया विवरण करणार्‍या शास्त्राला भाषाशास्त्रीय मानवशास्त्र असें म्हणतात. ही मानवशास्त्र विषयाचीच एक उपशाखा आहे. पारंपारिक भाषिक मानवजातीचा अभ्यास करणारे हे शास्त्र समाजशास्त्र व त्या अनुषंगाने लोक जीवनाचा अभ्यास करते. या अभ्यासांच्या निष्कर्षाने समाजशास्त्र विषयात अनेक बदल घडून आले आहेत.

                                               

दिलीप खैरनार

प्रगत सामाजिक संशोधन पद्धती व सांख्यिकी शैक्षणिक रामजन्मभूमी - बाबरी मशीद प्रश्न वैचारिक समाजशास्त्रीय मूलभूत संकल्पना शैक्षणिक समाजशास्त्र परिचय शैक्षणिक, सहलेखक पी. के. कुलकर्णी भारतीय समाजातील नैतिक मूल्ये सामाजिक वृद्धांच्या समस्या चिंता आणि चिंतन मार्गदर्शनपर भारतीय ग्रामीण समाजशास्त्र शैक्षणिक

सामाजिक शास्त्र
                                               

सामाजिक शास्त्र

मानवी वर्तन व समाज यांसंबंधीच्या शास्त्रांना सामाजिक शास्त्र किंवा सामाजिक विज्ञान असे म्हणतात. सामाजिक शास्त्रे ही व्यापक संकल्पना असून् नैसर्गिक शास्त्र नसणाऱ्या सर्व शास्त्रांचा यात सामावेश होतो. उदा. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, नागरीकशास्त्र, राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, पुरातत्वशास्त्र, शिक्षणशास्त्र इत्यादि.

                                               

आधुनिकीकरण.

आधुनिकीकरण आधुनिकीकरण म्हणजे अर्थ व्यवस्थेतील विविध प्रकारच्या संस्थात्मक व रचनात्मक बदलांची प्रक्रिया होय. संस्थात्मक बदल हे आधुनिकीकरणाचा पाया ठरतात. आधुनिकीकरणात नवीन बदले, उत्पादन तंत्र व पद्धती यांना महत्त्व प्राप्त होते. आधुनिकीकरणात आधुनिकचा दुसऱ्या बाजूने विचार करताना शेती क्षेत्रावरील अवलंबित्व कमी करून औदोयागिकरणाला प्राधान्य देणे म्हणजे आधुनिकीकरण होय. भारतीय अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्रतील आधुनिकीकरणाच्या बाबतीत महत्त्वाची भूमिका पार पाडली जाते.

                                               

एकत्र कुटुंब पद्धती

एकत्र कुटुंब पद्धती मध्ये एकाहून जास्त पिढ्या किंवा एकाच पिढीतील अनेक भावंडे एकाच घरात राहतात. भारतात ग्रामीण भागात ही पद्धत प्रचलित असली तरी नागरी भागातून ही पद्धत आता हळूहळू नाहीशी होत आहे.

ऑगस्ट कॉम्ट
                                               

ऑगस्ट कॉम्ट

"ऑगस्ट कॉम्ट" हे समाजशास्त्राचे जनक होत. १८३८ मध्ये पोझिटिव्ह फिलॉसॉफि या ग्रंथाच्या चौथ्या खंडात sociology असा उल्लेख केला.

मार्क्सचा परकीयीकरणाचा सिद्धान्त
                                               

मार्क्सचा परकीयीकरणाचा सिद्धान्त

कार्ल मार्क्सच्या परकीयीकरणाच्या सिद्धान्तानुसार लोकांचे त्यांच्या मानवी स्वभावाच्या पैलूंपासून होणारे सामाजिक परकीयीकरण हे सामाजिक वर्गांमध्ये विभागलेल्या समाजात जीवन जगण्याचा परिणाम आहे.

वर्णद्वेष
                                               

वर्णद्वेष

वर्णद्वेष ही समाजातील ठरावीक लोकांविरुद्ध भेदभाव करण्याची एक पद्धत आहे. वर्णद्वेषी विचारपद्धतीनुसार समाजामधील लोकांचे जात, वर्ण इत्यादी बाबींवरून वेगळे गट पाडले जातात. एक गटाला समाजात उच्च स्थान तर दुसर्‍या गटाला दुय्यम स्थान देण्यात येते. दक्षिण आफ्रिकेमधील वर्णभेद हे वर्णद्वेषाचे राजकीय स्तरावरील वापराचे उदाहरण आहे. नाझी जर्मनीद्वारे घडवण्यात आलेले होलोकॉस्ट देखील वर्णद्वेषाचेच उदाहरण आहे.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →