Back

ⓘ युद्ध - भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध, व्हियेतनाम युद्ध, दुसरे इंग्रज-मराठा युद्ध, महाभारतीय युद्ध, कारगिल युद्ध, क्राइमियन युद्ध, मेक्सिकन-अमेरिकन युद्ध, घोडदळ ..                                               

भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध

डिसेंबर १९७१ मध्ये झालेले भारत पाक युद्ध भारत व पाकिस्तानमधील तिसरे युद्ध होते. या युद्धात भारताने पाकिस्तानचा निर्णायक पराभव केला व बांगलादेशची निर्मिती केली.युध्दाची सुरुवात पाकिस्तानी आक्रमणाने झाली.

                                               

व्हियेतनाम युद्ध

व्हियेतनाम युद्ध हे शीत युद्धकालातील व्हियेतनाम, लाओस आणि कंबोडियामध्ये लढले गेलेले युद्ध होते. ह्या युद्धाचा कालावधी साधारणतः नोव्हेंबर १, इ.स. १९५५ ते एप्रिल ३०, इ.स. १९७५पर्यंत मानण्यात येतो. हे युद्ध उत्तर व्हियेतनाम व त्याचे कम्युनिस्ट सहकारी विरुद्ध दक्षिण व्हियेतनाम, अमेरिका व त्यांचे कम्युनिस्ट-विरोधी सहकारी असे लढले गेले. आग्नेय आशियामधील वाढत्या कम्युनिस्ट शक्तीला रोखणे हा अमेरिकेचा ह्या युद्धात पडण्याचा हेतू होता. व्हियेत काँग ह्या दक्षिण व्हियेतनाममधील परंतु उत्तर व्हियेतनामच्या बाजूने लढणाऱ्या पक्षाने कम्युनिस्टविरोधी सेनेविरुद्ध शिवरायांच्या गनिमी काव्याचा वापर केला. जवळजवळ २ ...

                                               

दुसरे इंग्रज-मराठा युद्ध

दुसरा बाजीराव पेशवा हा अधिकाराने जरी मराठ्यांच्या राज्याचा मुख्य कार्यकारी असला तरी पेशव्यांचे राज्यावरचे नियंत्रण संपुष्टात आल्यात जमा होते. मराठ्यांची सत्ताकेंद्र पुण्यावरुन आता इंदूर व ग्वाल्हेर येथे गेले. महादजी शिंद्याच्या निधना नंतर मराठ्याच्या एकीमधील कच्चे दुवे बाहेर येउ लागले. पेशवे व शिंदेना होळकरांनी ऑक्टोबर २५ १८०२ रोजी पुण्याच्या जवळ पराभूत केले. पराभवा नंतर होळकरांनी पुण्याचा ताबा घेतला व दुसरा बाजीराव पळून इंग्रजाकडे आश्रयासाठी गेला व संधी केली जी वसईचा तह या नावाने ओळखली जाते. या तहानुसार इंग्रजांनी बाजीरावला मराठ्यांच्या सत्ता स्थानी पुन्हा बसवण्यासाठी मदत करण्याचे मान्य क ...

                                               

महाभारतीय युद्ध

महाभारत युद्ध हे कौरव आणि पांडव या दोन सैन्यात लढले गेले. हे युद्ध १३ ऑक्टोबर इ.स.पू. ३१३९ या दिवशी सुरू झाले, असे दिल्लीच्या इन्स्टिटूट ऑफ सायंटिफिक रिसर्चमधील संशोधकांचे म्हणणे आहे.

                                               

कारगिल युद्ध

कारगिल युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यासन १९९९ च्या उन्हाळ्यात लढले गेलेले मर्यादित युद्ध होते. या युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगिल व आजूबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित राहिली, त्यामुळे याला मर्यादित युद्ध म्हणतात. तसेच या पूर्वीच्या भारत-पाक युद्धांप्रमाणेच याही युद्धात, युद्ध सुरू झाल्याची व संपल्याची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नव्हती. उलट पाकिस्तानतर्फे युद्धादरम्यान त्यांचा देश अलिप्त आहे असा कांगावा करण्यात आला होता. पुढे अनेक वर्षांनंतर हळूहळू पाकिस्तान सरकारने व अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी हे युद्धच होते असे जाहीर केले.सन १९९९ च्या उन्हाळ्यात, पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीम ...

                                               

क्राइमियन युद्ध

क्राइमियन युद्ध हे फ्रेंच साम्राज्य, ब्रिटिश साम्राज्य, ओस्मानी साम्राज्य व सार्दिनियाचे राजतंत्र ह्यांच्या युतीने रशियन साम्राज्याविरुद्ध लढलेले १९व्या शतकामधील एक युद्ध होते. सध्या युक्रेनच्या अंमलाखाली असलेल्या क्राइमिया ह्या द्वीपकल्पावर प्रामुख्याने घडले गेलेले हे युद्ध ढासळत्या ओस्मानी साम्राज्याच्या अधिपत्याखाली असलेल्या अनेक भूभागांवर सत्ता प्रस्थापित करण्याच्या अनेक प्रयत्नांपैकी एक होते. हे युद्ध रेल्वे, टेलिग्राफ इत्यादी अनेक आधुनिक तंत्रांच्या वापरासाठी तसेच फ्लॉरेन्स नाइटिंगेल ह्या ब्रिटिश नर्सने केलेल्या कामासाठी स्मरणीय ठरले. पूर्व युरोपात सुमारे तीन वर्षे चाललेल्या ह्या युद ...

मेक्सिकन-अमेरिकन युद्ध
                                               

मेक्सिकन-अमेरिकन युद्ध

मेक्सिकन-अमेरिकन युद्ध हे मेक्सिको आणि अमेरिकेमध्ये १८४६-१८४८मध्ये लढले गेलेले युद्ध होते. यात मेक्सिकोचा सपशेल पराभव झाला व त्याचा अर्धा भाग अमेरिकेने हस्तगत केला. याचबरोबर मेक्सिकोने आपल्यापासून विभक्त झालेल्या टेक्सासच्या प्रजासत्ताकाला अधिकृत मान्यता दिली.

कळरीपयट्ट
                                               

कळरीपयट्ट

कळरीपयट्ट ही एक युद्धकला आहे. या युद्धपद्धतीचा उगम केरळ मध्ये झाला. यात तलवारीचा वापर प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी चपळाईने केला जातो.

घोडदळ
                                               

घोडदळ

घोड्यावर स्वार होवून युद्धात भाग घेणार्‍या सैन्यदलास घोडदळ म्हणतात. घोडेस्वारांस अधिक शस्त्रास्त्रे व चिलखते वाहून नेणे तसेच वेगांत कूच करणे सोपे असल्यामूळे पायदळापेक्षा घोडदळाची कार्यक्षमता जास्त असते.

                                               

मर्यादित युद्ध

मर्यादित भागातच लढले जाणाऱ्या युद्धाला मर्यादित युद्ध असे म्हणतात. सहसा दोन पक्ष एकमेकांवर शक्य तेथे हल्ले करतात परंतु राजकीय, भौगोलिक किंवा नैतिक कारणांमुळे हे मर्यादित राहू शकते. भारत व पाकिस्तानातले कारगिल युद्ध याचे उदाहरण आहे.

लढाऊ हत्ती
                                               

लढाऊ हत्ती

लढाऊ हत्ती हा एक माणसांनी प्रशिक्षित व नियंत्रित केलेला युद्धात वापरला जाणारा हत्ती असे. यांचा मुख्य उपयोग शत्रूसैन्यावर चाल करून जाउन त्यांची फळी फोडणे व त्यांच्यांत घबराट पसरवून देण्याचा असे.

हवाई सुरक्षा यंत्रणा
                                               

हवाई सुरक्षा यंत्रणा

शत्रूच्या हवाई मार्गाने केलेल्या कोणत्याही प्रकारच्या हल्ल्यापासून बचाव करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या यंत्रणेस अथवा व्यवस्थेस हवाई सुरक्षा यंत्रणा म्हणतात. या यंत्रणेचे कार्य, शत्रू हल्ल्यादरम्यान त्यांची बॉम्बफेकी विमाने, रडारपासून छुपी लढाऊ विमाने, सर्व प्रकारची क्षेपणास्त्रे आदींना शोधणे,त्याचा मागोवा घेणे व पर्यायांचा वापर करून त्यांना लक्षावर पोचण्याआधी नष्ट करणे अशा प्रकारचे असते.अत्याधुनिक लढाईत या यंत्रणेचे स्थान बरेच महत्त्वाचे असते.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →