Back

ⓘ क्रिकेट - क्रिकेट, ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ, भारतीय क्रिकेट संघ, वेस्ट इंडीज क्रिकेट संघ, आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती, मेलबर्न क्रिकेट मैदान, हाँगकाँग क्रिकेट ..                                               

क्रिकेट

क्रिकेट हा मैदानावर प्रत्येकी ११ खेळाडूंच्या दोन संघांदरम्यान, चेंडू आणि फळी ने खेळला जाणारा मैदानी खेळ आहे. क्रिकेटच्या मैदानाच्या मध्यभागी एक २२-यार्ड लांबीची मुख्य खेळपट्टी असते. तिच्या दोन्ही टोकांना प्रत्येकी ३ लाकडी यष्टी असतात. एक संघ फलंदाजी संघ म्हणून खेळतो. हा संघ जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करतो, आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ क्षेत्ररक्षण करतो. खेळाच्या प्रत्येक टप्प्याला डाव असे म्हणतात. संघाचे दहा फलंदाज बाद झाल्यानंतर किंवा निर्धारित षटके पूर्ण झाल्यानंतर दोन्ही संघ आपापली भूमिका बदलतात. एका किंवा दोन डावांत अतिरिक्त धावा मिळून ज्या संघाची धावसंख्या जास्त असेल तो विजेत ...

                                               

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ हा ऑस्ट्रेलिया देशाचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. कसोटी क्रिकेट खेळणारा तो इंग्लंडसोबत सर्वात जुना क्रिकेट संघ असून ह्या दोन संघांदरम्यान इ.स. १८७७ साली पहिला कसोटी सामना खेळवला गेला होता. कसोटी व एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्तम संघ मानला जात असलेल्या ऑस्ट्रेलियाने आजवर ७६४ कसोटी सामन्यांमध्ये ३५८ विजय मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियाने आजवर क्रिकेट विश्वचषक विक्रमी चार वेळा जिंकला आहे: १९८७, १९९९, २००३ व २००७. ऑस्ट्रेलियाच्या इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेला द ॲशेस तर भारताविरुद्ध होणाऱ्या मालिकेला बॉर्डर-गावस्कर चषक असे नाव आहे.ऑस्ट्रेलिया २०१५ चा विश्वचषक मि ...

                                               

भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ कसोटी खेळणाऱ्या संघापैकी आहे. भारताचा पहिला अधिकृत कसोटी सामना जून २५, १९३२ रोजी सुरू झाला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया ही भारतीय क्रिकेटची प्रशासकीय संघटना आहे. क्रिकेट भारतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे.

                                               

वेस्ट इंडीज क्रिकेट संघ

वेस्ट इंडीज क्रिकेट संघ हा कॅरिबियन प्रदेशामधील १५ देशांचा एकत्रित क्रिकेट संघ आहे. ह्या देशांमध्ये प्रामुख्याने भूतपूर्व ब्रिटिश वसाहती व राष्ट्रकुल राष्ट्रांचा समावेश होतो. १९७५ ते १९९० दरम्यान वेस्ट इंडिज हा जगातील सर्वात बलाढ्य क्रिकेट संघांपैकी एक मानला जात असे. १९७५ व १९७९ हे पहिले दोन क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या तसेच १९८३ विश्वचषकामध्ये अंतिम फेरी गाठणाऱ्या वेस्ट इंडीजमध्ये गॅरी सोबर्स, क्लाइव्ह लॉईड, व्हिव्ह रिचर्ड्स इत्यादी ख्यातनाम खेळाडूंचा समावेश होता. २०१२ सालची २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा जिंकुन वेस्ट इंडीजने विश्वचषक विजयांचा ३३ वर्षांचा दुष्काळ संपवला.

                                               

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती ही क्रिकेट ह्या खेळाची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संघटना आहे. इ.स. १९०९ मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांनी इंपेरियल क्रिकेट संघटनेची स्थापना केली. इ.स. १९६५ मध्ये या संघटनेचे नाव बदलून आंतररष्ट्रीय क्रिकेट सभा असे ठेवण्यात आले. इ.स. १९८९पासून सध्याचे नाव उपयोगात आणले जात आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनचे ९७ सदस्य देश आहेत. आय.सी.सी. सामन्यांसाठी पंच व पर्यवेक्षक यांची नियुक्ती करते.

                                               

मेलबर्न क्रिकेट मैदान

मेलबर्न क्रिकेट मैदान हे ऑस्ट्रेलिया देशाच्या मेलबर्न शहरामधील एक क्रिकेट मैदान आहे. १,००,१०८ इतकी आसनक्षमता असलेले एमसीजी हे ऑस्ट्रेलियामधील सर्वात मोठे तर जगातील आठव्या क्रमांकाचे मोठे क्रीडा संकुल स्टेडियम आहे. व्हिक्टोरिया बुशरेंजर्स हा ऑस्ट्रेलियामधील क्रिकेट क्लब येथून खेळतो तसेच ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय क्रिकेट संघ देखील हे मैदान वापरतो. एमसीजी १९५६ उन्हाळी ऑलिंपिक तसेच २००६ राष्ट्रकुल खेळांसाठीचे प्रमुख स्थान होते. तसेच १९९२ मधील क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम फेरीचा सामना येथेच खेळवण्यात आला होता. क्रिकेट व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियन फुटबॉल, रग्बी लीग, रग्बी युनियन, फुटबॉल इत्यादी अनेक खेळांच ...

स्कॉटलंड क्रिकेट संघ
                                               

स्कॉटलंड क्रिकेट संघ

स्कॉटलंड क्रिकेट संघ हा स्कॉटलंड देशाचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे, हा संघ १९९४ साली आय.सी.सी.चा अर्ध-सदस्य बनला. स्कॉटलंड आजवर १९९९ व २००७ ह्या दोन विश्वचषक स्पर्धांसाठी पात्र ठरला आहे.

हाँगकाँग क्रिकेट
                                               

हाँगकाँग क्रिकेट

हाँगकाँग क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत हाँगकाँगचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. हा संघ प्रथमतः १८६६मध्ये अस्तित्त्वात आला. १९६९पासून हा संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनमध्ये असोसियेट सदस्य म्हणून दाखल झाला.

केनिया क्रिकेट संघ
                                               

केनिया क्रिकेट संघ

केनिया क्रिकेट संघ हा आफ्रिकेतील केनिया देशाचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. इ.स. १९८१ पासून आय.सी.सी.चा असोसिएट सदस्य असलेल्या केनियाने २००३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीमध्ये धडक मारून सर्व क्रिकेट जगताला चकित केले होते. २००७ व २०११ सालच्या विश्वचषक स्पर्धांमध्ये पहिल्याच फेरीत पराभूत झालेल्या केनियाला २०१५ स्पर्धेत पात्रता मिळवण्यात अपयश आले. इ.स. २०१४ साली केनियाचा कसोटी क्रिकेट खेळण्याचा दर्जा काढून टाकण्यात आला.

                                               

अंध क्रिकेट

अंध क्रिकेट हा अंध अथवा अंशत: अंध व्यक्तींसाठी खेळला जाणारा क्रिकेट खेळ आहे. या खेळाचे आत्तापर्यंत तीनदा विश्वचषकासाठी सामने आयोजित केले गेले आहेत. अंधांसाठीचा पहिला क्रिकेट विश्वचषक नवी दिल्ली, भारत येथे इ.स. १९९८ साली, दुसरा विश्वचषक चेन्नई, भारत येथे इ.स. २००२ साली तर तिसरा विश्वचषक इस्लामाबाद, पाकिस्तान येथे इ.स. २००६ साली आयोजित करण्यात आला होता.

अवांतर धावा (क्रिकेट)
                                               

अवांतर धावा (क्रिकेट)

क्रिकेट या खेळात, अवांतर किंवा अतिरिक्त धावा म्हणजे अशा धावा ज्या फलंदाजांनी चेंडू न टोलवता इतर मार्गांनी संघाच्या धावसंख्येत जमा होतात. नो बॉलवर बॅटने चेंडू टोलवून काढलेल्या l000धावांव्यतिरिक्त इतर कोणत्याही अवांतर धावांचे श्रेय फलंदाजाला दिले जात नाही. धावफलकावर अवांतर धावा वेगळ्या मोजल्या जातात आणि संघाच्या एकूण धावसंख्येत जमा होतात. ज्या सामन्यात अनेक अवांतर धावा दिल्या जातात तो सामना सहसा अव्यवस्थित गोलंदाजी म्हणून मानला जातो.

                                               

आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमधील विक्रमांची यादी

सामान्यतः एका विक्रमाबाबतीत पहिले पाच मानकरी दिलेले आहेत. पहिल्या पाचांमध्ये संयुक्त मानकरी असल्यास त्या सर्वांची दखल घेतलेली आहे. निवृत्त न झालेल्या खेळाडूंची नावे ठळक ठशात दिली आहेत.

                                               

आननी क्षेत्र

आननी क्षेत्र हा क्रिकेटच्या मैदानाचा एक विभाग आहे. खेळपट्टीच्या लांब अक्षाच्या मधोमध काल्पनिक रेषा ओढून क्रिकेट मैदानाचे दोन भाग केले जातात. उजव्या हाताच्या फलंदाजाच्या संदर्भात, तो फलंदाजीसाठी पवित्रा स्टान्स घेऊन उभा असताना, त्याच्या समोरची तोंडाकडीलबाजू, म्हणजेच गोलंदाजाच्या आणि बिन-टोल्या टोकाच्या पंचाच्या डाव्या हाताकडील बाजू, म्हणजे आननी क्षेत्र होय.

आननी फिरकी
                                               

आननी फिरकी

आननी फिरकी हा क्रिकेटमधील गोलंदाजीचा एक प्रकार आहे. या गोलंदाजीला आंतरफिरकी किंवा उजवी फिरकी अशी पर्यायी नावे आहेत. या प्रकारात उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज त्याच्या बोटांचा व/वा मनगटाचा वापर करून चेंडूला उजव्या हाताच्या फलंदाजाच्या आननी क्षेत्रापासून पृष्ठीय क्षेत्राकडे फिरक देतो. याचा अर्थ टप्पा पडल्यानंतर चेंडू उजव्या हाताच्या फलंदाजाकडे किंवा डाव्या हाताच्या फलंदाजापासून दूर जातो. पृष्ठीय फिरकीमध्ये चेंडू पृष्ठीय क्षेत्राकडून आननी क्षेत्राकडे फिरक घेतो.

                                               

आयकॉन खेळाडू

भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेत आयकॉन खेळाडू हा असा खेळाडू असतो ज्याला आपल्या शहराच्या संघा कडून खेळावे लागते. इतर खेळाडूं प्रमाणे आयकॉन खेळाडू लिलाव पद्धतीत सामिल नसतात. प्रत्येक आयकॉन खेळाडूला, त्याच्या संघातील सर्वात महागडया खेळाडू पेक्षा १५ % अधिक मानधन दिले जाईल.

आशिया क्रिकेट संघटन
                                               

आशिया क्रिकेट संघटन

आशिया क्रिकेट संघाची सुरवात १९८३ मध्ये आशिया क्रिकेट सभा या नावाने झाली. या संघटनेचा उद्देश आशिया विभागात क्रिकेट खेळाचा प्रचार व प्रसार करणे आहे. हि प्रादेशिक संघटना आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेला संलन्ग आहे. १९९५ मध्ये ह्या संघटनेला सध्याचे नाव मिळाले. आशिया क्रिकेट संघाचे मुख्यालय कुलालंपुर, मलेशिया येथे आहे व या संघाचे २२ सदस्य देश आहेत.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →