Back

ⓘ पोटॅशियम आरगॉन कालमापन पद्धती. पोटॅशिअम अर्गोन कालमापन पद्धती ही जे. एफ. एव्हर्णडेन आणि जी. एच. कर्टिस यांनी इ.स. १९६१ मध्ये शोधून काढली. या पद्धतीत कालमापनाचा ..



                                     

ⓘ पोटॅशियम आरगॉन कालमापन पद्धती

पोटॅशिअम अर्गोन कालमापन पद्धती ही जे. एफ. एव्हर्णडेन आणि जी. एच. कर्टिस यांनी इ.स. १९६१ मध्ये शोधून काढली. या पद्धतीत कालमापनाचा आवाका खूप मोठा असतो. अडिच हजार ते चार अब्ज वर्षे इतके जुने अवशेष या पद्धतीने कालमापीत करता येतात. पोटॅशिअम अर्गोन पद्धतीत पोटॅशिअम ४० K या घटकाचे अर्धे आयुष्य १.३ अब्ज + ४० दशलक्ष वर्ष इतके प्रचंड आहे. पृथ्वीच्या कवचात पोटॅशिअम हा घटक फार मोठ्या प्रमाणावर आढळतो. हाच घटक जवळजवळ प्रत्येक खनिजात आढळतो. याचे विघटन झाल्यावर त्यातून अर्गोन ४० हा वायू तयार होतो. याचे संक्षिप्त रुप ४० Ar असे मांडतात. खडकाच्या घडणीत हा अर्गोन ४० नाहिसा होतो. खडकाची घडण पूर्ण झाल्यावर ४० K चे विघटन चालू राहते. ही विघटन क्रिया चालू असताना अर्गोन ४० ची निर्मिती होत असते. या अर्गोन ४० चे मापन करून त्या खडकाचा काळ मोजता येतो. या पद्धतीने प्राचीन खडकाचे कालमापन करता येते. त्यामुळे या पद्धतीचा उपयोग भूविज्ञानशास्त्राला जास्त होतो. पुरातत्वशास्त्रात प्रागैतिहासिक, पाषाणयुगीन हत्यारांचा काळ ठरविण्यासाठी या पद्धतीचा उपयोग होतो. मात्र हा काळ हत्यारांच्या बनावटित वापरलेल्या दगडांचा ठरतो.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →