Back

ⓘ प्राचीन इजिप्त संस्कृती ईशान्य आफ्रिकेतील नाइल नदीच्या खोऱ्यात वसलेली संस्कृती होती. साधारणपणे इ.स.पू. ३१५०च्या सुमारास पहिल्या फॅरोने उत्तर व दक्षिण इजिप्तचे ए ..



प्राचीन इजिप्त संस्कृती
                                     

ⓘ प्राचीन इजिप्त संस्कृती

प्राचीन इजिप्त संस्कृती ईशान्य आफ्रिकेतील नाइल नदीच्या खोऱ्यात वसलेली संस्कृती होती. साधारणपणे इ.स.पू. ३१५०च्या सुमारास पहिल्या फॅरोने उत्तर व दक्षिण इजिप्तचे एकत्रीकरण केल्यानंतर ही संस्कृती उदयास आली असे मानले जाते. पुढील ३,००० वर्षे हीचा विकास होत गेला. या दरम्यान अनेक वंशाच्या राजांनी सत्ता धारण केली. साधारण इ.स.च्या पहिल्या शतकात इजिप्तवर परकीय सत्तांचे शासन आले. इ.स.पू. ३१च्या सुमारास रोमन साम्राज्याने शेवटच्या फॅरोचा पराभव करून इजिप्तला आपला एक प्रांत करून घेतले. खोदकाम, बांधकाम, शेती यात प्रावीण्य मिळवलेली आणि स्थिर समाजरचना असलेली ही संस्कृती होती. ओझायरिस या मृत्यूच्या देवते शिवाय जवळपास दोन हजार देवतांची पूजा प्राचीन इजिप्तमध्ये केली जात होती. देवाच्या सेवेसाठी पुरोहित नेमलेले होते. मृत्यूनंतर मनुष्य वेगळया लोकात जातो. तेथे त्याला नव्याने मिळणारे आयुष्य चिरंतन असते, असा प्राचीन इजिप्शियनांचा ठाम विश्वास होता. इजिप्शियनांच्या मते मृत्यू ही जीवनाची सुरुवात होती. त्यामुळे या संस्कृतीत मृतांबरोबरच त्यांची आठवण म्हणून कांही वैशिष्टपूर्ण दागिने मृतदेहाबरोबर पुरण्याची प्रथा येथे होती. इजिप्तमध्ये प्राचीन काळी हायरोग्लिफक्स ही चित्रलिपी वापरली जात असे. वनस्पतीपासून तयार केलेल्या ‘पपॅरस’ नावाच्या कागदावर लिखाण केलं जात असे.

                                     

1. बाह्य दुवे

  • "Ancient Egypt" इंग्रजी भाषेत. ब्रिटिश संग्रहालय. ५ जानेवारी २०१४ रोजी पाहिले.
  • "Egyptians" इंग्रजी भाषेत. बी.बी.सी. हिस्ट्री. ५ जानेवारी २०१४ रोजी पाहिले.
Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →