Back

ⓘ पर्यटनशास्त्र:-पर्यटन ही संज्ञा प्रवास या शब्दाशी संबंधित आहे आणि प्रवास हा शब्द लॅटिन भाषेतील Tornos या शब्दापासून आलेला आहे. Tornos शब्दाचा मूळ अर्थ वर्तुळ कि ..                                               

पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ

या विद्यापीठात एकूण १३ संकुले आहेत. स्थापत्य दंतचिकित्सा आयुर्वेद जैवतंत्रज्ञान आणि जैवमाहितीशास्त्र फ़िजिओथेरपी व्यवस्थापन औषधिनिर्माणशास्त्र अभियांत्रिकी ऑक्युपेशनल थेरपी रुग्णशुश्रूषा आदरातिथ्य व पर्यटन वैद्यकशास्त्र विधी

                                               

निजिनो मत्सुबारा

निजिनो मत्सुबारा हे जपानच्या सागा प्रांतातील करात्सु शहराजवळील एक ३६० वर्षाचे पाइन झाडांचे वन आहे. हे वन म्हणजे ४०० - ७०० मीटर रुंद आणि सुमारे ४ किमी लांबीचा एक झाडांचा पट्टा आहे. याचे एकूण क्षेत्रफळ २४० हेक्टर आहे. या वनाला द ब्लॅक पाइन फॉरेस्ट ऑफ १ मिलियन ट्रीज असेही म्हणतात. परंतु हे नाव आता फारसे वापरात नाही. मूळतः हे जंगल जुन्या काळचे सरंजाम तेराजावा हिरोताका यांनी कराट्सु खाडीतूने येणारा जोरदार वारा आणि लाटा थोपावण्यासाठी लावले होते. आज हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे आणि जपानमधील १०० सर्वात सुंदर ठिकाणांच्या यादीमध्ये नोंदणीकृत आहे. हे जंगल चिकुही लाइनमार्गे कराट्सू शहर आणि फुकुओका श ...

पर्यटन
                                     

ⓘ पर्यटन

पर्यटनशास्त्र:-पर्यटन ही संज्ञा प्रवास या शब्दाशी संबंधित आहे आणि प्रवास हा शब्द लॅटिन भाषेतील Tornos या शब्दापासून आलेला आहे. Tornos शब्दाचा मूळ अर्थ वर्तुळ किंवा वर्तुळाकार असा आहे. याच शब्दापासून पुढे वर्तुळाकार प्रवास किंवा पॅकेज टूर्स हा शब्द रुढ झाला.

एका व्यक्तीने किंवा व्यक्ती समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मनोरंजनासाठी, अभ्यासासाठी, कामासाठी केलेला प्रवास म्हणजे पर्यटन होय.

मनोरंजन, फुरसत किंवा कामासाठी केलेला प्रवास म्हणजेच पर्यटन. जागतिक पर्यटन संस्था World Tourism Organization ही जे लोक प्रवास करून आपल्या परिसराबाहेरील जागी जाऊन सलग १ वर्षापेक्षा कमी काळ मनोरंजन, काम वा इतर कारणांसाठी रहातात ते अशी पर्यटकांची व्याख्या करते.

पर्यटन हे फुरसतीचा वेळ घालविण्याचे एक साधन म्हणून जगभरात अतिशय लोकप्रिय झाले आहे. २००० च्या शतकाच्या अखेरीस आलेल्या जागतिक मंदीने व H1N1 फ्लूच्या साथीने २००८ च्या मध्यापासून ते २००९ च्या अखेरपर्यंत रोडावलेल्या पर्यटनाला परत बरे दिवस आले असून २०१२ मध्ये जागतिक पर्यटकांच्या संख्येने १०० कोटीचा पल्ला इतिहासात पहिल्यांदा ओलांडला. आंतरदेशीय पर्यटन उत्पन्न आंतरदेशीय देणे जमाखात्यातले पर्यटनावरचे उपखाते २०११त १.०३ लाख कोटी अमेरिकन डॉलर ७४ हजार कोटी युरो इतके वाढले. ते २०१० च्या तुलनेत ३.८% अधिक होते. २०१२त चीन जगातील पर्यटनावर सर्वात जास्त खर्च करणारा देश बनला आणि त्याने अमेरिका व जर्मनी यांना त्याबाबतीत मागे टाकले. चीन व उदयोन्मुख राष्ट्रे रशिया व ब्राझील ठळकपणे ह्यांचा पर्यटनावरचा खर्च गेल्या दशकात लक्षणीय वाढला आहे.

==शब्देतिहास==maharashtatil praytan thale

                                     

1. इतिहास

अतिप्राचीन काळापासून प्रवास ही मनुष्यप्राण्याची सहज प्रवृत्ती आहे. प्राचीन काळातील प्रवासाच्या पद्धती व संकल्पना या आजच्या काळातील प्रवास पद्धती व संकल्पना यापेक्षा वेगळया आहेत. प्राचीन काळी प्रवासाचा उद्देश नवीन प्रदेशचा शोध घेणे, व्यापार करणे व धार्मिक स्थळांना भेट देणे हा होता. हे प्रवासी व व्यापारी विविध भूप्रदेश, देश व राज्यातून प्रवास करत असत. त्यामुळे विविध राज्यांच्या राजधान्या, शहरे, बंदरे, बाजारपेठांची केंद्रे, व्यापारी मार्ग यांचा त्यांच्याषी संबंध येत असे. हा प्रवास व व्यापार यांतून विविध मानवी समूह, संस्कृती यांची परस्पर ओळख झाली. अनेक गोष्टीची देवाण घेवाण झाली. एकमेकांच्या समाजजीवनाचे आकलन झाले. प्रवास व पर्यटनाच्या वाढीसाठी या बाबी अनुकूल ठरल्या. मध्ययुगात व्यापाÚयांच्या प्रवासाच्या पद्धतीत बदल झाले. आनंद मिळविण्यासाठी, मनोरंजनासाठी प्रवास ही संकल्पना प्रथम युरोपातील रोमन लोकांनी रूजवली. रोमन साम्राज्याच्या काळात तेथील लोक इजिप्तमधील पिरॅमिड्स, ग्रीसमधील अथेन्स व स्मार्टा या नगरांची भव्य नगररचना, तेथील देव देवतांची मंदिरे, मूर्ती, तेथील क्रीडांगणे पाहण्यासाठी जात. पुढे युरोपमधील पुनरूज्जीवनामुळे जगभरातील वसाहतींचा व साम्राज्याचा विस्तार, औद्योगिक क्रांती व यातून युरोपमध्ये सुरू झालेला संपत्तीचा ओघ यांमुळे तेथे पर्यटनही श्रीमंतांची मक्तेदारी न राहता मध्यम वर्गसुद्धा पर्यटनात सहभागी झाला. त्यात धर्मप्रसारक, विद्वान, लेखक, कवी व व्यापारी यांचा समावेश होता. युरोपियन पर्यटकांनी आधुनिक पर्यटनाचा पाया घातला.

                                     

1.1. इतिहास आधुनिक पर्यटन

उद्देश: १. पर्यावरण जतन २. पुरातन वस्तूंची हानी न करणे

                                     

1.2. इतिहास हिवाळी पर्यटन

भारतीय पर्यटनाचा इतिहास हा हजारो वर्षो जुना आहे. हजारो वर्षापासून भारतीय उपखंडात लोक तीर्थक्षेत्रIन्ना भेट देण्याकरीता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत आलेत. भारतीय ग्रंथात सुद्धा याचे पुरावे भेटतात ज्यात, पंढरीची वारी, कुंभमेळा यांचे संदर्भ वाचण्यास मिळतात. तसेच इंग्रजांनी जेव्हा भारतावर राज्य केले तेंव्हा त्यांचा दोन राजधानी असत, हिवाळी राजधानी आणि उन्हाळी राजधानी. इंग्रज उन्हाळ्यात महाबळेश्वरला, शिमला, कश्मीर, उटी, म्हेसूर अशा ठिकाणी राहाण पसंत करत. इंग्रज हे राज्यकर्ते होते आणि त्यांचाकडे कामासाठी किवां निगराणी साठी भारतातील काही राजे महाराजे किवा अधिकारी होते, ज्यांना कामानिम्मित इंग्रजांचा माघे त्या त्या ठिकाणी जावे लागे. भारताला स्वातंत्र्य मिळाले इंग्रज हा देश सोडून गेले पण त्यांचा मागे येथील श्रीमंत घराणे आणि राजे महाराजे यांना मात्र अशा फिरण्याची चटक लागली आणि स्वतंत्र भारतात फिरण्याची वेगवेगळे प्रदेश बघण्याची इच्छा तर प्रत्येक सामान्य माणसाला होती ती या लोकांना बघून उदयास आली आणि अशा प्रकारे आधुनिक भारता मध्ये हिवाळी पर्यटन उदयास आले.                                     

2.1. हल्लीचे बदल आरोग्य पर्यटन

आरोग्य पर्यटनात पर्यटक आल्हाददायक स्वच्छ हवामानात आपल्या प्रकृतीत सुधारणा करण्यासाठी अथवा आहे तशीच ठेवण्याचा प्रयत्‍न करतो. पूर्वी यालाच हवापालट असे म्हणत. लोकमान्य टिळक अशाच कारणासाठी सिंहगडावर जाऊन रहात.

प्रदूषणमुक्त व आल्हाददायक वातावरण व जोडीला निसर्गसौंदर्य असल्यास आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, म्हणूनच स्थानिक पर्यटनात पर्यटक जवळच्या शांत निसर्ग संपन्न व सौंदर्याने नटलेल्या परिसरात हवापालटासाठी जातात. अशा पर्यटनात पर्यटक एका आठवड्यापासून ते तीन महिन्यापर्यंत वास्तव्य करतात. उदा० महाबळेश्वर, माथेरान, चिखलदरा, वाई, पाचगणी, इत्यादी गावी जाऊन राहणे.

                                     

2.2. हल्लीचे बदल शैक्षणिक पर्यटन

शैक्षणिक पर्यटन म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी केलेला प्रवास होय.यामध्ये शैक्षणिक सहली,शैक्षणिक परिषद किंवा संशोधनासाठी देशामध्ये किंवा देशाबाहेर केलेला प्रवास यांचा समावेश होतो.विद्यार्थ्यांच्या दृष्टीने या पर्यटनाला जास्त महत्त्व आहे कारण क्षेत्र अभ्यास केल्यामुळे वेगवेगळ्या संकल्पना समजण्यास मदत होते.

                                     

2.3. हल्लीचे बदल इतर पर्यटन प्रकार

एकल पर्यटन ही संकल्पना पश्चिमात्य देशात लोकप्रिय आहे.एकट्याने थोडक्या साहित्यानिशी पर्यटनाला बाहेर पडणे,पर्यटनाचे नियोजन करून अथवा न करता लवचिक धोरणानुसार ठिकठिकाणी पर्यटन करणे.ही प्रमुख संकल्पना या मागे असते.शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी किंवा व्यवसाय करण्या अगोदर काही काळाचा विश्राम घेऊन तरुण-तरुणी एकट्याने पर्यटनासाठी बाहेर पडतात.या मध्ये अनेक भले-बुरे अनुभव येतात,व जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन विस्तृत होतो.भारतातही हल्ली या प्रकारचे पर्यटन करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.

फुकी-जी
                                               

फुकी-जी

फुकी-जी हे जपानच्या ओइटा प्रांताच्या बुंगोटकडा मधील एक तेंदई मंदिर आहे. या मंदिराची स्थापना स.न. ७१८ मध्ये झाली. आमिडा-डो ज्याला सामान्यत: फुकी-जी ओ-डो असेही म्हटले जाते. ही कुयूषा बेटावरील सर्वात जुनी लाकडी रचना आहे. या रचनेला राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित केलेले आहे. ओ-डो मध्ये असलेली अमिदा-न्यराई यांची बसलेली प्रतिमा राष्ट्रीय सरकारने महत्त्वपूर्ण सांस्कृतिक मालमत्ता म्हणून घोषित केली आहे.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →