Back

ⓘ ढाक. पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ ..




                                     

ⓘ ढाक

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

                                     

1. प्रेक्षणीय स्थळे

गावाच्या पूर्वेस ढाकगड नावाचा किल्ला आहे. किल्ल्यावर तटबंदी, पाण्याचे टाके, वास्तूंचे अवशेष आहेत. ढाकगडाच्या डोंगराला एक सुळका असून त्या कळकराई सुळका म्हणतात. गडाच्या पोटात दोन कोरलेल्या गुहा असून एका गुहेत भैरवनाथाची मुर्ती आहे. त्यामुळे ही गुहा ढाकाचा बहिरी म्हणून प्रसिद्ध आहे. येथे पोहचण्याचा मार्ग थोडा कठीण आहे.