Back

ⓘ चिंचघर, विक्रमगड तालुका. पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवाम ..




                                     

ⓘ चिंचघर (विक्रमगड तालुका)

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

                                     

1. लोकजीवन

हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३४९ कुटुंबे राहतात. एकूण १७४९ लोकसंख्येपैकी ८५७ पुरुष तर ८९२ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.

                                     

2. नागरी सुविधा

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस विक्रमगड बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्शासुद्धा विक्रमगडवरुन उपलब्ध असतात.

                                     

3. जवळपासची गावे

माण, देहरजे, टेटावली, बांधण, खांडेघर, भोपोळी,घाणेघर, बोरांडे, बांगरचोळे, शिळ, हाताणे ही जवळपासची गावे आहेत.चिंचघर ग्रामपंचायतीमध्ये आपटी बुद्रुक,आणि चिंचघर ही गावे येतात.