Back

ⓘ चिंचाळे. डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे भुपेंद्र कलेक्शन आणि आंबेसरी गेटीपाडा ग्रामपंचायत कार्यालय गेल्यानंतर हे गाव लागते. डहाणू बस स्थानक ..
                                     

ⓘ चिंचाळे

डहाणू बस स्थानकापासून जव्हार मार्गाने गेल्यावर पुढे भुपेंद्र कलेक्शन आणि आंबेसरी गेटीपाडा ग्रामपंचायत कार्यालय गेल्यानंतर हे गाव लागते. डहाणू बस स्थानकापासून हे गाव २४ किमी अंतरावर आहे.

                                     

1. हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.

                                     

2. लोकजीवन

हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २९६ कुटुंबे राहतात. एकूण १४४९ लोकसंख्येपैकी ७४९ पुरुष तर ७०० महिला आहेत. गावाची साक्षरता ५७.१८ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६७.३९ आहे तर स्त्री साक्षरता ४६.०१ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २१६ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १४.९१ टक्के आहे. वाडवळ, भंडारी, आगरी, आणि आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. येथे शेती हा व्यवसाय असून काही लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर, खाजगी, सरकारी नोकर, कामगार म्हणूनही काम करतात. दुग्धव्यवसाय, बकरीपालन, कुक्कुटपालन सुद्धा केले जाते.

                                     

3. नागरी सुविधा

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस डहाणू बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्शासुद्धा डहाणूवरुन उपलब्ध असतात.

                                     

4. जवळपासची गावे

बोडगाव, नागझरी, तालोठे, पुंजावे, सासवंद,आंबिवळीतर्फेबहारे, पांढरतारागाव,करंजवीरा, शिसणे, आष्टे, नारुळी ही जवळपासची गावे आहेत.चिंचाळे ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.