Back

ⓘ जुनी जव्हार. पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते ..




                                     

ⓘ जुनी जव्हार

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

                                     

1. लोकजीवन

हे मध्यम आकाराचे लहान गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ८० कुटुंबे राहतात. एकूण ३८२ लोकसंख्येपैकी १८८ पुरुष तर १९४ महिला आहेत. गावाची साक्षरता ६५.४१ टक्के आहे.पुरुष साक्षरता ७५.६४ आहे तर स्त्री साक्षरता ५५.५६ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ६४ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १६.७५ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात. अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा ते करतात.

                                     

2. नागरी सुविधा

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्शासुद्धा जव्हारवरुन उपलब्ध असतात.

                                     

3. जवळपासची गावे

रामपूर, आपटाळे, चंद्रपूर, गंगापूर, धानोशी, काशिवळी तर्फे देंगाचीमेट, शिरोशी, विजयनगर, वाळवंडे, कडाचीमेट, साकुर ही जवळपासची गावे आहेत.जुनी जव्हार ग्रामपंचायतीमध्ये जुनी जव्हार आणि काशिवळी तर्फे देंगाचीमेट गावे येतात.

                                     

4. जमिनीचा वापर

जुनी जव्हार ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो हेक्टरमध्ये क्षेत्रफळ:

  • ओसाड व लागवडीला अयोग्य जमीन: ०.७८
  • कुरणे व इतर चराऊ जमीन: ४.२५
  • बिगरशेती वापरात असलेली जमीन: ३२२
  • कायमस्वरूपी पडीक जमीन: ३३.६९
  • लागवडीयोग्य पडीक जमीन: १५९.८
  • एकूण बागायती जमीन: ८१.७१
  • फुटकळ झाडीखालची जमीन: ४.२
  • एकूण कोरडवाहू जमीन: ८९
  • पिकांखालची जमीन: १७०.७१
  • वन: ०.५७