Back

ⓘ डोंगरवाडी. जव्हार बस स्थानकापासून झाप मार्गाने गेल्यावर धानोशी रस्त्याने जाऊन रामखिंड-पाथर्डी रस्त्याने हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव १२ किमी अंतर ..
                                     

ⓘ डोंगरवाडी

जव्हार बस स्थानकापासून झाप मार्गाने गेल्यावर धानोशी रस्त्याने जाऊन रामखिंड-पाथर्डी रस्त्याने हे गाव लागते. जव्हार बस स्थानकापासून हे गाव १२ किमी अंतरावर आहे.

                                     

1. हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

                                     

2. लोकजीवन

हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १९१ कुटुंबे राहतात. एकूण ८७२ लोकसंख्येपैकी ४२३ पुरुष तर ४४९ महिला आहेत. गावाची साक्षरता ४१.३३ टक्के आहे.पुरुष साक्षरता ५२.१२ आहे तर स्त्री साक्षरता ३१.४९ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या १८० आहे.ती एकूण लोकसंख्येच्या २०.६४ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन,बकरीपालन सुद्धा ते करतात. येथे भरपूर प्रमाणात रानभाज्या मिळतात. खरशिंग,करडू,बाफली,पेंढर, बांबूशिंद,कवळ, खुरासनीचा पाला, लोत, शेवळी, उडदाचा पाला, काकड, रानचिकू, आभईची शेंग, अळबी, आंबट बिबली, माड, चावा वेल,टेरा, कर्टुलं,लोथी, सतरा, हळंदा, शेवळे,कोरड, टाकळा, शेवगा, तेरे, कुडाची फुलं, घोळ, कोळू, रताळ्याचे कोंब, टेंभरण, मोहदोडे,नारळी, मोखा, चायवळ, वांगोटी, भोपा, बोंडारा, रानकेळी, भारंगा ह्या काही रानभाज्या आहेत. ह्या भाज्या मुख्यतः पावसाळ्यात होतात.ह्या भाज्या पोटाचे विकार, खोकला आणि इतर तत्सम आजारावर गुणकारी असतात. आदिवासी समाज बांधवांना त्याची चांगली समज असते. तारपा नृत्य आणि वारली रंगकला हे आदिवासी समाजाचे अविभाज्य भाग आहेत.

                                     

3. नागरी सुविधा

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस जव्हार बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात.रिक्शासुद्धा जव्हारवरुन उपलब्ध असतात.

                                     

4. जवळपासची गावे

श्रीरामपूर, नांदगाव, राजेवाडी, झाप, शिवाजीनगर, पाथर्डी, चौक, मेढे, खिडसे, ऐने, मानमोहाडी ही जवळपासची गावे आहेत.पाथर्डी ग्रामपंचायतीमध्ये डोंगरवाडी आणि पाथर्डी गावे येतात.