Back

ⓘ चितळीगांव. महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामधील खटाव तालुक्यात चितळी हे गाव असून चितळी गावापासून जिल्ह्याचे ठिकाण सातारा सुमारे ७० कि.मी. अंतरावर आहे. चितळी ..
                                     

ⓘ चितळीगांव

महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामधील खटाव तालुक्यात चितळी हे गाव असून चितळी गावापासून जिल्ह्याचे ठिकाण सातारा सुमारे ७० कि.मी. अंतरावर आहे. चितळी गावापासून तालुक्याचे ठिकाण खटाव सुमारे २४ कि.मी. अंतरावर आहे. चितळी गावाचे क्षेत्रफळ सुमारे ४०८०.०० हेक्टर आहे. इवलेसे|उजवे

                                     

1. लोकसंख्याशास्त्र

२०११ च्या जनगणनेनुसार चितळी गावाची एकूण लोकसंख्या ६३५१ आहे. सुमारे १३०९ कुटूंब चितळी गावात राहतात. गावात पुरुषांची संख्या 3176 असून महिलांची संख्या 3175 आहे.

इवलेसे|उजवे|ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे आणि या मातीतुनी चैतन्य गावे कोणती पुण्ये अशी येती फ़ळाला जोंधळ्याला चांदणे लखडून जावे.

                                     

2. वाहतूक

रस्ता

चितळी गावचा पिन कोड ४१५५३८ आहे. दळणवळणासाठी एसटी बसची सुविधा चितळी गावात आहे. चितळी गावात रेल्वे स्टेशन नाही. चितळी गाव राष्ट्रीय महामार्गा लगत नाही. चितळी गाव राज्यमार्गा लगत आहे. चितळी गाव जिल्हामार्गा लगत आहे.

रेल

चितळी गावात रेल्वे स्टेशन नाही. चितळी गाव राष्ट्रीय महामार्गा लगत नाही. चितळी गाव राज्यमार्गा लगत आहे. इवलेसे|उजवे

बॅंक

चितळी गावात राष्ट्रीयकृत/व्यवसायिक बॅंक आहेत. चितळी गावात सहकारी बॅंक आहेत. चितळी गावात विविध कार्यकारी सोसायटी आहेत.

ए. टि. एम

चितळी गावामध्ये भारतीय स्टेट बॅक ऑंफ इंडिया या राष्ट्रीयकृत बॅकेची शाखा असुन ती गावच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. तसेच या बॅकेचे ए. टि. एम. मशीन चितळी गावापासुन सहा कि. मी. अंतरावरती उपलब्ध आहे. इवलेसे|उजवे

बाजार

चितळी गावात दैनिक बाजार आहे. चितळी गावात अाठवडे बाजार आहे. चितळी गावात सार्वजनिक वाचनालय आहे. चितळी गावात वर्तमानपत्राची उपलब्धता आहे.
                                     

3. पर्यटक स्थान

चितळी गावामध्ये टेंभु उपसा सिंचन प्रकल्पाअंतर्गत सुमारे 3 कि. मी अंतर लांबीचा टेंभु केनॉंल बांधण्यात आला आहे.

प्रमुख रस्ते

चितळी गावापासुन पंढरपुर ते मल्हारपेठ रस्ता तसेच चितळी ते विटा, चितळी ते मायणी, चितळी ते माहुली असे गावच्या लगत जाण्यासाठीचे प्रमुख जोड रस्ते आहेत.

चितळी गावची महसुली गावे

१) चितळी

२) शेडगेवाडी

  • चितळी गावाअंतर्गत वस्त्या

१) पवारमळा २) मोहितेमळा ३) घवळ ४) मधली घवळ ५) विद्यानगर

६) दत्तनगर ७) कारभारओढा ८) धनवडे वस्ती ९) माळी वस्ती १०) संध्या मठ

११) कदम मळा १२) येरळा नगर १३) जानकर वस्ती १४) घाडगे मळा १५) देशमुख मळा इवलेसे|उजवे

                                     

4. ग्रामपंचायत चितळी मधिल समिती

1) ग्राम,आरोग्य,पोषण,पाणीपुरवठा स्वच्छता कमिटी

2) ग्रामदक्षता कमिटी

3)महात्मा गांधी तंटामु्क्त कमिटी

4)संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता कमिटी

5)पाणीपुरवठा कमिटी

ग्रामपंचायत चितळी अंतर्गत दिल्या जाणा-या सेवा

1) रहिवाशी दाखला 2) दारीद्यरेषेखालील दाखला 3) मृत्यृ दाखला

4) विज ना हरकत दाखला 5) ह्यातीचा दाखला 6) थकबाकीचा दाखला

7) लाभ न घेत्याचे प्रमाणपत्र

8) जन्म-मृत्यृ अनुउपल्बधता प्रमामपत्र 9) शौचालयाचा दाखला

10) घरगुती नळ जोडणी अर्ज 11) चांगल्या वर्तणुकीचा दाखला

12) विज पुरवठा मिळण्याकरीता ना हरकात प्रमाणपत्र 13) विवाह नोंदीचे प्रमाणपत्र

                                     

5. ग्रामपंचायत चितळी

चितळी ग्रामपंचायत मध्ये एकुण १५ सदस्यांचे कार्यकारणी मंडळ आहे. त्यापैकी ओ. बी. सी. प्रवर्गामध्ये ५ जागा खुला प्रवर्ग मध्ये – ९ जागा व अनुसुचीत जाती प्रवर्ग मध्ये -१ जागा अश्या तसेच यामध्ये १५ जागापैकी महिला आरक्षित प्रवर्गासाठी एकुण ८ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
                                     

6. सार्वजनिक कार्यक्रम

मौजे चितळी गावामध्ये प्रामुख्याने विविध प्रकारच्या श्री. भैरवनाथ यात्रा, श्री. जोतिर्लिग यात्रा व विठ्ठल महाराज या यात्रांचे आयोजन केले जाते व आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, तसेच इतर सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
                                     

7. गावतील शाळा

गावामध्ये नवमहाराष्ट्र विद्यालय चितळी हे महाविद्यालय असुन येथे इ. ५ वी ते इ. १०वी तसेच ११वी, व १२ वी आर्ट चे शिक्षण दिले जाते. तसेच गावामध्ये प्राथमिक शाळा ६ असुन यामध्ये इयत्ता १ली ते ४ थी पर्यंतच्या विद्यार्थांना शिक्षण दिले जाते.

इवलेसे|डावे इवलेसे|मध्यवर्ती