Back

ⓘ जलसार. पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावस ..




                                     

ⓘ जलसार

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

                                     

1. लोकजीवन

हे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ५१५ कुटुंबे राहतात. एकूण २१५३ लोकसंख्येपैकी १११८ पुरुष तर १०३५ महिला आहेत. गावाची साक्षरता ८२.४८ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८९.७७ आहे तर स्त्री साक्षरता ७४.६२ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या २३० आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १०.६८ टक्के आहे.

                                     

2. नागरी सुविधा

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सफाळे रेल्वे स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शासुध्दा सफाळेवरुन उपलब्ध असतात.

                                     

3. जवळपासची गावे

कांद्रेभुरे, मिठागर, बंदर, कोरे, खर्डी, टेंभीखोडावे, वाढीवसरावली, वेढी, नवघर, उंबरवाडा तर्फे मनोर, खारवडश्री ही जवळपासची गावे आहेत.जलसार ग्रामपंचायतीमध्ये जलसार, खारमेंडी आणि खारवडश्री ही गावे येतात.