Back

ⓘ रमेश मुधोळकर हे एक बालसाहित्यकार व चित्रकार होते. रमेश मुधोळकर यांचे प्राथमिक शिक्षण मलकापूर येथे आणि माध्यमिक शिक्षण मुंबईच्या छबिलदास हायस्कूलमध्ये झाले. मुंब ..



                                     

ⓘ रमेश मुधोळकर

रमेश मुधोळकर हे एक बालसाहित्यकार व चित्रकार होते.

रमेश मुधोळकर यांचे प्राथमिक शिक्षण मलकापूर येथे आणि माध्यमिक शिक्षण मुंबईच्या छबिलदास हायस्कूलमध्ये झाले. मुंबईच्या जे.जे. कला महाविद्यालयातून त्यांनी कर्मिशयल आर्टचे शिक्षण घेतले होते.

१९७२ मध्ये त्यांनी केलेले अनुवादित पुस्तक कॉन्टिनेन्टल प्रकाशनने प्रकाशित केले होते. दोनच वर्षांनी त्यांनी शालापत्रक हे शालेय मुलांसाठीचे मासिक सुरू केले. लेखनाबरोबरच पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि आतील सजावट व चित्रे मुधोळकर यांचीच असत. बालकुमारांवर संस्कार करणारी सुमारे ३०० पुस्तके त्यांनी लिहिली.

शिक्षण सुरू असतानाच मुधोळकारांनी जयको पॉकेट बुक्ससाठी चित्रांचे काम केले. अमर चित्रकथा या गाजलेल्या चित्रकथा मालिकेचे काम त्यांनी केले आहे. एको बुक्स या कुमार वाङ्मयाच्या पुस्तक मालिकांच्या निर्मितीत त्यांचा वाटा होता.

मुधोळकरांनी देशोदेशीच्या रसाळ कथा नव्याने सांगितल्या. एवढेच नव्हे तर खगोलशास्त्र, चित्रकला, अक्षरचित्रांसह अंकलिपी, भारतीय विज्ञान सप्तर्षी, भारतरत्न, पक्षी, प्राण्यांचे बंड, बडबडगीते असे मुशाफिरी करणारे लेखनही त्यांनी केले. मुधोळकरांनी मराठीप्रमाणेच इंग्रजीतही लेखन केले. शंकरमहाराज आणि दिगंबरदास महाराजांसारख्या परमार्थी व्यक्तींच्या गोष्टींमधून त्यांनी संदेशपर लेखन केले.

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन या संस्थेच्या स्थापनेत रमेश मुधोळकरांचा अमरेंद्र गाडगीळ यांच्याबरोबर सहभाग होता. या संस्थेचे ते संस्थापक-सदस्य होते.

२००९मध्ये मुधोळकरांच्या लेखनसंपदेच्या संख्येच्या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली.

                                     

1. पुस्तके

  • कोणे एके काळी
  • जयप्रकाश नारायण
  • फंटूश संपावर जातो
  • नवनाथांच्या गोष्टी
  • देशोदेशीचे मित्र
  • The Happy Mans Shirt
  • Tales Of Sambhaji
  • भारतीय विज्ञान सप्तर्षी
  • The Silent Parrot
  • रामायणातील गोष्टी
  • थोरांच्या गोष्टी राष्ट्रपुरुषांची चरित्रे
  • The Prince And The Lions
  • लोभाचे फळ
  • साता समुद्रापलीकडे
  • बिरबल आणि बादशहाच्या १७५ गोष्टी
  • महात्मा जोतीराव फुले चरित्र
  • फार फार वर्षांपूर्वी
  • 175 Stories Of Akbar And Birbal
  • लबाड कोल्हा नि सवाई ससा
  • मिठाचा शोध लेखिका - अंजली अत्रे, संपादन व सजावट - रमेश मुधोळकर
  • मुल्ला नसरुद्दीन एक वल्ली
  • The Ungrateful Dog
  • The Sleeping Princess
  • भगवान महावीराच्या गोष्टी
  • मुलांसाठी नीतिकथा
  • Tales From Panchtantra
  • किती हसाल?
  • खेळ खेळू या जमतीचे
  • उंदराचं तुटलं शेपूट!
  • बोलका शंख
  • जातक कथा
  • पूर्ण अक्षरचित्रांसह अंकलिपी
  • इसापनीतीच्या ५३० गोष्टी
  • महात्मा गांधी
  • आपले पक्षी
  • सद्गुरू श्रीबाबामहाराज सहस्रबुद्धे
  • श्री साईबाबांच्या गोष्टी
  • गाढवाला आली अक्कल
  • काउन्टिंंग प्रवासवर्णन?
  • पंडित जवाहरलाल नेहरू
  • गणपतीच्या गोष्टी
  • श्री टेंबेस्वामी महाराज यांच्या गोष्टी
  • भारतीय कलारत्न
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • Stories Of Nana Phadnis
  • नेताजी सुभाषचंद्र बोस
  • चलाख माकड
  • महाभारतातील गोष्टी
  • Three handfuls Of Rice
  • गुणी मुले
  • चतुर कोल्हा
  • भारतरत्न
  • मोत्या आळंदीला जातो
  • Dick Whittington And His Cat
  • अंक ओळख १ ते १०
  • श्री अक्कलकोटस्वामी महाराजांच्या गोष्टी
  • द थर्टी-नाइन स्टेप्स अनुवादित, मूळ लेखक - Authors:जॉन बुकानन
  • Stories From Mahabharata
  • शहाणपणाची किंमत
  • मिठूमियां! मिठूमियां!
  • The Talking Conch - Shell
  • शेरलॉक होम्सच्या साहसकथा
  • सिलोनचा बिरबल
  • हसत खेळत चित्रकला
  • Shri Ramkrishna Paramhansa
  • दोन ध्रुवांवर विजय
  • Brer Rabbit
  • कालयंत्र
  • The Mouses Cap
  • कोळ्यांची चतुराई
  • प्राण्यांचे बंड
  • रवींद्रनाथ टागोर
  • देशोदेशीच्या लोककथा
  • चीनचा बिरबल आफंदी
  • हेराची चतुराई
  • लोकमान्य टिळक
  • The Foolish Husband
  • Fun With Counting 1 To 10
  • मोरारजी देसाई
  • मुल्ला नसरुद्दीनचे अजब किस्से
  • विसराळूपणाची कमाल
  • कोंबड्याचे शहाणपण
  • पराक्रमी भीम
  • The King Of Birds
  • Gautam Buddha
  • Nursery Rhymes
  • सर्कसच्या गोष्टी
  • छत्रपती शिवाजी
  • शेखचिल्लीच्या गोष्टी
  • सवाई जादूगार
  • अमृतपुलीन बालकादंबरी
  • एकोणचाळीस पायर्‍या अनुावादित; मूळ इंग्रजी लेळक - जॉन बॅकन
  • Mahatma Gandhi
  • आफ्रिकेतील साहस
  • स्कॅरॅमाऊश अनुवादित, मूळ लेखक - रफाएल साबातिनी
  • विश्वविख्यात बोधकथा
  • पाशा मराठी अनुवाद; मूळ लेखिका - ज्योती सोलापूरकर
  • भागवतातील गोष्टी
  • गौतम बुद्धाच्या गोष्टी
  • The Greedy Young Fox
  • फ्रॅन्केन्स्टाईन
  • Stories From Aesop
  • The Story Of Shivaji
  • बोधिसत्त्वाच्या बोधपर ९० गोष्टी
  • जयंत आणि जादूचे दूध
  • आचार्य विनोबा भावे
  • The Tales Of Shri Balaji
  • पक्षी
  • अरेबियन नाईट्स
  • देशोदेशींच्या अद्भुत कथा
  • बॅस्करव्हीलचा शाप The Hound of Baskerville चा मराठी अनुवाद
  • स्वामी विवेकानंदांच्या गोष्टी
  • शेक्सपियरच्या नाट्यकथा
  • The Fruit Of Greed
  • माकडा माकडा हूप!
  • दमास्कसचा बुटका
  • सर्वधर्म समभाव
  • The Wisdom Of The Cock
  • सद्गुणांच्या गोष्टी
  • Lokmanya Tilak
Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →