Back

ⓘ तळवट बोरगाव. हे गेवराई तालुक्यातील गाव असून या गावात येण्यासाठी बीड, गेवराई मार्गावर असलेल्या पाडळशिंगी या गावाजवळून पाचेगाव नंतर १० किलोमीटर अंतरावर तळवट बोरगा ..
                                     

ⓘ तळवट बोरगाव

हे गेवराई तालुक्यातील गाव असून या गावात येण्यासाठी बीड, गेवराई मार्गावर असलेल्या पाडळशिंगी या गावाजवळून पाचेगाव नंतर १० किलोमीटर अंतरावर तळवट बोरगाव आहे. हे गाव गेवराई शहरापासून २५ कि.मी तर बीड या जिल्हा मुख्यालयापासून ३२ कि.मी. दूर आहे.

                                     

1. इतिहास

या गावाला "गाडे घोलपाचे बोरगाव" म्हणूनही ओळखले जात असे. सुमारे ९० वर्षापूर्वी येथे पटकी या साथीच्या रोगाची तीव्र साथ आली होती. या गावचा छोटा बाजार सोमवार या दिवशी भरत असे.३ कि.मी दक्षिणला असलेल्या कुक्कडगाव येथे मोठा बाजार भरतो. येथिल दगडाचे बांधकाम असलेली प्राचीन विहीर किंवा स्थानिक भाषेत बारव प्रसिद्ध आहे. येथे साळवे, गाडे, घोलप, गायकवाड, भिसे, शिंदे,राऊत, आडनावाचे लोक राहतात.

                                     

2. लोकसंख्या

इ.स.२०११ च्या जनगणनेनुसार एकूण ३९६ घरे आहेत. एकूण लोकसंख्या १८५९ असून पुरुष ९५३ तर स्त्रिया ९०६ आहेत. वयोगट ० ते ६ मधील बालकांचे एकूण गावाच्या लोकसंख्येच्या १३.७७% प्रमाण असून संख्या २५६ आहे. स्त्री-पुरुष प्रमाण १००० पुरुषामागे ९५१ स्त्री असून ते महाराष्ट्र राज्याच्या ९२९ या सरासरी प्रमाणापेक्षा अधिक आहे.