Back

ⓘ अरेसीबो वेधशाळा ही अटलांटिक महासागरातील पोर्तो रिको देशामध्ये अरेकिबो शहराच्या दक्षिणेला बारा किलोमीटर अंतरावर असलेली एक वेधशाळा आहे. अरेसीबो वेधशाळेचे प्रमुख स ..



अरेसीबो वेधशाळा
                                     

ⓘ अरेसीबो वेधशाळा

अरेसीबो वेधशाळा ही अटलांटिक महासागरातील पोर्तो रिको देशामध्ये अरेकिबो शहराच्या दक्षिणेला बारा किलोमीटर अंतरावर असलेली एक वेधशाळा आहे. अरेसीबो वेधशाळेचे प्रमुख साधन रेडियो दुर्बीण हे आहे. अमेरिकेचे संरक्षण खाते आणि कॉर्नेल विद्यापीठाच्या संयुक्त प्रकल्पान्वये ही वेधशाळा १ नोव्हेंबर, इ.स. १९६३ रोजी बांधून पूर्ण झाली. हिच्या उभारणीसाठी ८३ लक्ष डॉलर्स खर्च आला होता.

                                     

1. अरेसीबो डिश ॲंटेना

अरेसीबो वेधशाळेच्या परिसरातील अनेक टेकड्यांच्या मधल्या खोलगट भागाचा अंतर्गोल आरशासारखा उपयोग करण्यात आला आहे. प्रत्यक्षात तो आरसा नसून विद्युतचुंबकीय संदेशांचे ग्रहण आणि प्रक्षेपण करणारी प्रचंड डिश ॲंटेना आहे. ही डिश निरनिराळ्या दिशांना फिरविता येत नाही किंवा तिचा कोनही बदलता येत नाही. अरेसीबो डिश ॲंटेनाचा व्यास ३०४ मीटर असून त्याने ८ हेक्टर २२० एकर क्षेत्र व्यापलेले आहे. डिशच्या सभोवती परिघाजवळ ११७ मीटर, ७९ मीटर आणि ७९ मीटर उंचीच्या तीन खांबांवरून ६५ मीटर लांबीच्या बाजू असलेला एक त्रिकोणी प्लॅटफॉर्म डिशच्या मधोमध आडवा तरंगत ठेवण्यात आला आहे. विद्युतचुंबकीय संदेश डिशवर परावर्तित होऊन प्लॅटफॉर्मवरील एका विशिष्ट बिंदूत एकत्र होतात. त्या ठिकाणी असलेल्या एका इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या साहाय्याने ते ग्रहण केले जातात.

अरेसीबो डिश ॲंटेना भूपृष्ठाशी जखडलेली असल्यामुळे केवळ वरून खाली सरळ येणारे संदेश ती ग्रहण करू शकते किंवा केवळ तिला त्याच दिशेत संदेश प्रक्षेपित करता येतात. सुरुवातीच्या काळात ४३ कोटी हर्ट्‌झ ४३० मेगाहर्ट्‌झ कंपनसंख्या असलेल्या रडार ट्रान्समिटरचा उपयोग संदेश प्रक्षेपणासाठी करण्यात आला होता.

Free and no ads
no need to download or install

Pino - logical board game which is based on tactics and strategy. In general this is a remix of chess, checkers and corners. The game develops imagination, concentration, teaches how to solve tasks, plan their own actions and of course to think logically. It does not matter how much pieces you have, the main thing is how they are placement!

online intellectual game →